भाजपा प्रवेशाच्या निर्णयाबाबत नितेश राणे यांचा खुलासा

कणकवली : महाराष्ट्र News 24

आमच्या दोघांमध्ये अतिशय उत्तम संवाद आहे. काही बाबतीत मतमतांतरे असतात त्याबाबत आम्ही चर्चा करतो.ते का पटले नाही हे त्यांनी मला सांगितले असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. राणे कुटुंबियांबद्दल तुम्ही कुठलीही चिंता करू नका. आमचा फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे, तो काही तुटणार नाही असे नितेश राणे म्हणाले.

निलेश हे माझे मोठे भाऊ असल्याने ते मला कधीही मार्गदर्शन करू शकतात. प्रत्येक गोष्टीवर दोघांचं एकमत होणं हे कोणाच्याच घरात शक्य नसल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. निलेश यांना राजकारणाचा एक वेगळा अनुभव आहे, त्यांना एक वेगळा दृष्टीकोन आहे. ट्विटबाबत माझे निलेश यांच्याबरोबर बोलणे झाले. त्यांनी मला सांगितले मला तुझा हा विषय पटला नाही माझी भूमिका वेगळी आहे. कोकणाच्या जनतेची इच्छा होती म्हणून भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून काम करावं लागणार अशी माझी भूमिका आहे. आदित्य ठाकरे सभागृहाचे सदस्य असतील तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल असे मी बोललो होतो, एका आमदारपुरता बोललो नव्हतो असेही नितेश यांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत