भाजपा महिला नगरसेविकेचा विनयभंग; ठार मारण्याचा प्रयत्न

रायगड माझा वृत्त 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित भाजपा महिला नगरसेवक आणि त्यांचे पती हे मोटारीतून चिंचवडला मुलीला भेटण्यासाठी जात होते. तेव्हा, भक्ती शक्ती चौकातून वळणावर यू टर्न घेत असताना आरोपी यांची फॉर्च्युनर ने कट मारून पीडित नगरसेविकेच्या गाडीला आडवी लावली. त्यानंतर अनोळखी आरोपीने त्यांना गाडीतून हाताला धरून खेचत ढकलून दिले.

भाजपा महिला नगरसेविकेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. नगरसेविकेच्या अंगावर गाडी घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तू माझ्या मालकाची तक्रार पोलिसात दिली अस म्हणून त्यांच्या कानशीलात लगावली. तसेच अश्लील  वर्तन केले असं फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, अशोक काळे याने नगरसेविकेच्या अंगावर गाडी घाल म्हणून अश्लील इशारे केले. त्यानंतर अनोळखी आरोपीने त्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा पर्यंत केला.

अशोक काळे असं आरोपीचे नाव असून आणखी एक अनोळखी आरोपी त्याच्यासोबत होता. ही घटना शहरातील भक्ती-शक्ती चौकात शुक्रवारी घडला आहे. संबंधित भाजपा नगरसेविका आणि त्यांचे पती हे भक्ती-शक्ती चौकातून मोटारीने जात असताना फॉर्च्युनर गाडी ने कट मारून पीडित नगर सेविकेच्या गाडीला फॉर्च्युनर आडवी लावून नगरसेविकेच्या हाताला धरून खाली खेचत कानशिलात लगावली.घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत