भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १७ लाख ६३ हजार ०५५ इतकी झाली आहे. अशात अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आता भाजप आमदार प्रसाद लाड यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे. तर सध्या त्यांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

“माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे.मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे,स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.” अस प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत