पुणे:रायगड माझा
आंळदी नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. बालाजी कांबळे असं या नगरसेवकाचं नाव आहे.
बालाजी कांबळे हे आळंदीकडे जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र हा हल्ला कोणत्या कारणांमुळे झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालं आहे.
शेयर करा