भाजप सोशल मिडिया रायगड जिल्हा सह- संयोजक व कर्जत विधानसभा संयोजक (अध्यक्ष) पदी राहुल सखाराम जाधव यांची नियुक्ती

खोपोली : समाधान दिसले

पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांचा नेतृत्वाने भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांतदादा ठाकुर साहेब यांच्या मार्गदर्शांनुसार व सोशल मीडिया प्रदेश अध्यक्ष आशिषजी मेरखेड यांचा सूचनेनुसार खोपोलीतील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते राहुल सखाराम जाधव यांची भाजप सोशल मिडिया रायगड जिल्हा सह – संयोजक तसेच 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांसाठी कर्जत विधानसभा संयोजक (अध्यक्ष) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नियुक्तीचे पत्र भाजपा पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, रायगड जिल्हा संयोजक विशाल शिंदे यांचा हस्ते देण्यात आले.
यावेळी खालापूर तालुका संयोजक सुधीर देशमुख व इतर सोशल मीडियाचे पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल जाधव यांनी भाजपचे उमेदवार म्हणून खोपोली नगरपरिषद २०१६ ची निवडणूक त्यांचे वडील हट्रिक किंग माजी उपनगराध्यक्ष सखाराम जाधव यांच्या पारंपारिक प्रभाग क्रमांक १ मधुन लढवित विरोधी गटातील उमेदवारासमोर त्यांनी तगडे आव्हान निर्माण करीत आपण राजकीय अस्तित्व दाखवून दिले मात्र त्याना निसटया पराभवाला सामोरे जावे लागले. राहुल जाधव फौंडेशन (रजि.) या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामजिक, सांस्कृतीक, कला व क्रिडा क्षेत्रात ते काम करीत आहेत. सोशल मीडियामध्ये सक्रिय असणारे राहुल जाधव यांच्या या नियुक्तीचे भाजप सोशल मीडियाचे काम आता चांगल्या पद्धतीने होईल असे शुभेच्छा देण्यात येत आहेत.

खोपोली शहरातील सोशल मिडीयावरील वजन नेतृत्व म्हणून त्यांच्या आदराने पाहिले जात असुन भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी त्यांनी खोपोली शहरात घौडदौड सुरू आहे. त्याच्या या निवडीने शहरातील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत