भाटघर धरण जलाशयात विवाहितेची आत्महत्या

भोर : रायगड माझा

भोलावडे (ता. भोर) गावच्या बुवासाहेबवाडी येथील विवाहित महिला वंदना सतीश शिंदे (वय 32) ही बुधवार (दि. 30 मे) पासून हरवल्याची भोर पोलिसांत नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी (दि. 1) या विवाहितेचा मृतदेह भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तरंगत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी भोर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटना स्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून, रात्री उशिरा भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह महिलेच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

या घटनेचा गुन्हा भोर पोलिसांत नोंदवण्यात आहे. या घटनेची फिर्याद या मृत विवाहितेचे वडील बाळासाहेब सदाशिव तुपे (वय 70, रा. भोलावडे) यांनी दिली असून, आजाराला कंटाळून वंदना शिंदे हिने आत्महत्या केली असावी, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलूस निरिीक्षक पांडुरंग सुतार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी.पी. साळुंके करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत