भात शेतीचे नुकसान झाल्याने सरपंच कृषि अधिकाऱ्यांना घेऊन थेट पोहचल्या शेताच्या बांधावर

नेरळ : अजय गायकवाड

कर्जत तालुक्यात झालेल्या महापुराने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.त्यातच तालुक्यातील भात शेतीचे देखील मोठ्याप्रमाणात महापुराने नुकसान झाल्याने हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी कृषिअधिकारी यांना बोलावून थेट शेतीच्या बांधावर नेऊन पंचनामे करून घेतले आहेत.

कर्जत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढून तालुक्यातील अनेक गाव वाड्या आणि शहरात पाणी शिरल्याने घरातील अन्न-धान्यांची नासाडी झाली होती.यात भातशेतात पाणी शिरल्याने शेत दुथडी भरून वाहत होती.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शेतकऱ्यांना भातपिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला बोराडे यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्या सर्व कृषी अधिकाऱ्यांना शेताच्या बांधावर नेऊन पंचनामा करून घेतले आहेत.

कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी तालुक्यातुन प्रथम शेतकऱ्यांप्रती पुढाकार घेऊन खंबीर भूमिका घेतली आहे. शेतीचे नुकसान किती झाले आहे,याची तालुक्यातील कृषी अधिकारी यांना घेऊन शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील हालीवली गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.याची माहिती सरपंच बोराडे यांनी ग्रामपंचायत कडून कृषी विभागाला दिली होती.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी कृषी सहायक संगीता पाटील ,सुवर्णा शिंदे,तसेच हालीवली गावातील शेतकरी बलिराम बोराडे,रामदास बोराडे, कल्पेश बोराडे, प्रविण बोराडे,रमेश शिंदे,हरीश्चंद्र जाधव,रंभाजी शिंदे,सुरेश बोराडे, आदींनी जाऊन अनेक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत