भायखळा महिला कारागृहातील ३०० कैद्यांना अन्नातून विषबाध

मुंबई : रायगड माझा वृत्त 

भायखळा महिला कारागृहातील ३०० कैद्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यापैकी ७८ महिला कैद्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी काही महिला कैद्यांना पोटदुखी, उलट्या सुरू झाल्या. हळूहळू ही संख्या वाढत गेली. काहीजणींची प्रकृती अधिक खालावत गेल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. या महिलांना उलट्या, जुलाब, पोटदुखी होत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तुरुंग अधिकारी राजवर्धन सिन्हा यांनी दिली.

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जीदेखील याच कारागृहात आहे. मात्र तिला अद्याप रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत