भायखळ्यात तीन लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त; दोघांना अटक

मुंबई : रायगड माझा वृत्त

500 व 2000 हजार रुपये दराच्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून तीन लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानाजवळ दोन इसम बनावट नोटा घेऊन येणार असून ते त्या नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असल्याची खबर युनिट-3 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निपुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बागल, पठाण, उघडे तसेच कांबळी, गावीत, वळवी, गोरेगावकर, राणे, चव्हाण या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम तेथे येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या ताब्यात 500 रुपये दराच्या 13 आणि दोन हजार रुपये दराच्या 147 बनावट नोटा मिळून आल्या. असाबुल मुसा कलिम शेख (26) आणि असिम रबान करमाकर (33) अशी त्या दोघांची नावे असून दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. या बनावट नोटा त्यांनी कुठून आणल्या याचा पोलीस शोध घेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत