मुंबई : रायगड माझा वृत्त
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट सोडल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. तिच्याबद्दल रोज नवीन खुलासे होत असतात. तिचा आणि निकचा साखरपुडा असेल किंवा निकसोबत सिंगापूरमध्ये सुट्टी घालवणे, यामुळे प्रियांकाचे नाव नेहमी चर्चेत असते. नुकतेच प्रियांकाने क्वांटिकोमधून काढता पाय घेतला. त्याच्यानंतर संजय लिला भन्सालीच्या चित्रपटालाही रामराम ठोकल्याचे म्हटले जात आहे.
महिला गँगस्टर गंगूबाई कोठेवालीवर आधारित एका चित्रपटाची निर्मिती भन्साली करणार होते. ज्यासाठी प्रियांकाची निवड केली गेली होती. मात्र प्रियांकाने या चित्रपटालाही रामराम ठोकल्यामुळे भन्सालींने हा चित्रपटच रद्द केल्याचे म्हटले जात आहे.
एका हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तिने या चित्रपटातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, तिच्या या लागोपाठ चित्रपट सोडण्याचा परिणाम तिच्या करिअरवरही होण्याची शक्यता आहे. याआधि प्रियांकाने संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात कासीबाई यांची भूमिका साखारली होती.