भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा

वॉशिंगटन : रायगडक माझा ऑनलाईन 

Image result for जॉन बोल्टन
स्वसंरक्षणार्थ भारत जी दहशतवादविरोधी कारवाई करेल त्याला अमेरिकेचा पूर्णपणे पाठिंबा आहे अशी भूमिका अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताला कळवली आहे. याप्रसंगी अमेरिका भारतासोबत असून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यासाठीही अमेरिका प्रयत्न करणार आहे.

एकीकडे भारताला मदत करण्यास तयार असतानाच दुसरीकडे पाकिस्तनानने दहशतवाद संपवावा अशी सक्त ताकीदच परराष्ट्र सचिव माइक पॉम्पिओ यांनी पाकिस्तानला दिली आहे. यानंतर पुलवामाला दहशतवादी हल्ल्याला भारत कसं प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत