भारताच्या मेरी कोमने जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्णपदक

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

हिंदुस्थानची स्टार खेळाडू मेरी कोम हिने गुरुवारी इतिहास रचला. मणिपूरच्या 35 वर्षीय बॉक्सरने 48 किलो वजनी गटात अंतिम फेरीत युक्रेनच्या हना ओखोता हिचा पराभव करत सहाव्यांना सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

विक्रमी सुवर्णपदक
मेरी कोम हिने अंतिम सामन्यापर्यंत या मानाच्या स्पर्धेत पाच सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकले होते. अंतिम सामन्यात विजय मिळवत मेरी कोम हिने विक्रम रचला. या आधी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आयर्लंडच्या कॅटी टेलर हिने पाच सुवर्ण व एक कास्य अशी एकूण सहा पदके जिंकून विक्रम रचला होता. मेरी कोम हिने हा विक्रम मोडीत काढत सातवे पदक पटकावताना नव्या विक्रमावर मोहोर उमटवली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत