भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटींच्या पार!

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांनी पार केला 9 हजारांचा टप्पा, 400 जणांनी सोडले प्राण | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढण्याचा वेग कमी झाला असला तरी अजून धोका टळलेला नाही.  देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १ कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात २५ हजार १५३ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ४ हजार ५९९ वर पोहचली आहे. यापैकी ३ लाख ८ हजार ७५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आतापर्यंत १ लाख ४५ हजार १३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे जवळपास ५२ टक्के इतके आहे. दरम्यान, भारताचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत