भारतात आम्ही डेटा सेंटर बनवत असल्याची बाइटडान्स कंपनीची घोषणा

मुंबई: रायगड माझा वृत्त

केंद्र सरकारने नुकतेच कंपनीला पत्र लिहून युजर्सचा डेटा कशाप्रकारे सेव्ह केला जातो, याबाबत प्रश्न विचारले होते. त्याशिवाय टिकटॉकवर युजर्सकडून येणाऱ्या कंटेटवरही प्रश्न निर्माण केले होते. त्यानंतर कंपनीने रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली. 

भारतातील तरुणाईमध्ये टिकटॉक प्रचंड लोकप्रिय आहे. त्याशिवाय हेलो अॅपदेखील लोकप्रिय होत आहे. आता मोठे पाऊल उचलण्याची वेळ आली असल्याचे कंपनीने सांगत भारतात आम्ही डेटा सेंटर बनवत असल्याची घोषणा केली. कंपनी आतापर्यंत भारतीय युजर्सचा डेटा सिंगापूर आणि अमेरिकेतील थर्ड पार्टी डेटा सेंटर्सवर स्टोर करत होती.  दरम्यान, युजर्स वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी टिकटॉकमध्ये आता नवीन अपडेट्सही येणार आहेत. त्याशिवाय टिकटॉकवर डिस्कवर टॅब, लिंक अकाउंटसारखी फिचर्स उपलब्ध होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत