भारतात लाँच झाला वनप्लस ६

मुंबई : रायगड माझा

भारतात नुकताच वनप्लस ६ हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून या स्मार्टफोनबाबतचे अनेक लीक रिपोर्ट गेल्या काही दिवसांपासून समोर येत होते. अखेर हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. आयफोन X प्रमाणे नॉच, स्लो-मो, स्नॅपड्रॅगन 845 या सारखे बरेच फीचर यामध्ये देण्यात आले आहेत.

दोन व्हेरिएंटमध्ये वनप्लस ६ हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून यामध्ये ६जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत ३९,९९९ रुपये आहे. अमेझॉन प्राईम मेंबर २१ मे पासून हा स्मार्टफोन अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन खरेदी करु शकणार आहेत. तर २२ मे रोजी ओपन सेल असणार आहे.

६.२८ इंच फुल एचडी स्क्रीन वनप्लस ६ मध्ये देण्यात आली असून त्याचे १०८०x२२६० पिक्सल रेझ्युलेशन आहे. तसेच यात गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन, तसेच स्नॅपड्रॅगन ८४५ चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे ६ जीबी / ८ जीबी रॅम असे दोन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये फेस अनलॉकसारखे फीचरही देण्यात आले आहेत. अवघ्या ०.४ सेंकदात हा फोन अनलॉक करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

यामध्ये प्रायमरी लेन्स १६ मेगापिक्सल तर सेकेंडरी लेन्स २० मेगापिक्सल आहे. तर यामध्ये फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल देण्यात आला आहे. यामध्ये स्लो-मो (स्लो मोशन) व्हिडीओचा देखील ऑप्शन देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी ३३०० mAh क्षमतेची आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत