भारताने पुन्हा एकदा घुसून मारले; पुलवामाचा बदला

mirage

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

आमच्याकडे असलेली शस्त्रे शोभेसाठी नसून, ती वापरण्याची ताकद आमच्यामध्ये असल्याची ताकद भारताने पुन्हा एकदा दाखवत पाकिस्तानमध्ये घुसून पुन्हा एकदा हल्ला केला आहे. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याचा हा बदला असल्याचे बोलले जात आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण होते. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच होती. भारतीय हवाई दलाच्या विमानाने एलओसी ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1000 किलो वजनाचा बॉम्बहल्ला केला. मिराज ही भारतीय हवाई दलातील 10 विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हा हल्ला केला.

नुकतीच काश्मीरमध्ये तणाव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवानांच्या 100 तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. शिवाय पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने राजस्थानमध्ये सीमारेषेनजीक प्रात्यक्षिके केली होती. त्यानंतर काहीतरी कारवाई होईल असे सांगण्यात येत होते. अखेर हवाई दलाने आज पहाटे साडेतीनच्या सुमारास कारवाई केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत