भारताला आज वायुदल दिनी मिळणार पहिलं राफेल जेट

नवी दिल्ली: महाराष्ट्र News 24 वृत्त

आज वायूदल दिन आणि विजयादशमी निमित्ताने भारताला पहिलं राफेल जेट मिळणार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला पोहोचले आहेत. ते याच राफेलमधून फ्रान्स एअरपोर्टच्या तळावरून उड्डाण करणार असून  भारताला राफेलची डिलीव्हरी पुढील वर्षी मिळणार आहे.

हे राफेल दोन इंजिनवालं लढाऊ विमान आहे. याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प मिसाइल तैनात आहेत, त्याद्वारे राफेलमुळे भारताला हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता प्राप्त होणार असून हि दोन्ही क्षेपणास्त्रे राफेलचं युएसपी आहेत. फ्रान्सला पोहोचल्यानंतर राजनाथ सिंह यांनी सांगितले की, ‘राफेल भारतात येत आहे. ८ ऑक्टोबर रोजी राफेल भारताला सुपूर्द करण्यात येणार आहे. सर्वचजण यासाठी खूप उत्साहात आहेत.’  पुढील काळात भारताला फ्रान्स कडून ३६ राफेल विमानांचा पुरवठा होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत