‘भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा प्रयत्न करू नये’ : सेन

शिलाँग : रायगड माझा ऑनलाईन

आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रिया अपरिणामकारक ठरली आहे, या प्रक्रियेमुळे परदेशी भारतीय झाले आहेत, आणि मुळ भारतीय बाहेर पडले आहेत हे दु:खद आहे, असे मत मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुदीप रंजन सेन यांनी व्यक्त केले. भारताला कुणीही इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा भारतासाठी आणि जगासाठी प्रलयकारी दिवस असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम आणि आदिवासींना कोणत्याही प्रक्रियेविना देशामध्ये नागरिकत्व देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, असेही सेन म्हणाले.
या प्रकरणातील गांभिर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी आवश्यक ते निर्णय घेतील आणि राष्ट्रहित लक्षात घेऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदींच्या निर्णयाला पाठिंबा देतील असेही ते म्हणाले. अमन राणाने निवासी दाखला मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका निकालात काढताना सेन यांनी वरील मत व्यक्त केले. देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक राष्ट्र घोषित केले. त्यामुळे भारतानेही हिंदू राष्ट्र घोषित करायला हवे होते, पण भारत अजून धर्मनिरपेक्ष देश आहे.

या निकालाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्र्यांना देण्यात यावी अशी विनंती सेन यांनी सहाय्यक सॉलिसिटर जनरल ए पॉल यांना केली. हिंदूंच्या हितासाठी केंद्र सरकार योग्य ती कारवाई करेल, असेही सेन यांनी नमूद केले. सेन २०१४ मध्ये मेघालय उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश झाले आहेत.

मी कोणत्याही मुस्लीम बंधू आणि भगिनींच्या विरोधात नाही, त्यांनाही शांततेत राहू दिले पाहिजे, असेही सेन म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत