भारताला विजयासाठी 84 धावांची गरज; विराटची दुसऱ्या डावातही झुंज

रायगड माझा वृत्त 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये भारताला विजयासाठी 84 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा भारताने 194 धावांचा पाठलाग करताना 5 गडी गमावून 110 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली 43 धावांवर खेळत आहे. विकेटकीपर दिनेश कार्तिक 18 धावांवर खेळत आहे.

भारताची सलामी जोडी पाठोपाठ मधली फळीही भारताची पुन्हा अपयशी ठरली. भारताचे सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाल्यानंतर लोकेश राहूल फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यानंतर अजिंक्य रहाणे व आर. आश्विनही विराटला साथ देऊ शकले नाहीत.   वेगवान स्टुअर्ट ब्रॉडने दोन, तर बेन स्टोक्स, अँन्डरसन व क्युरॅनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, फिरकी आर. आश्विनने दिलेल्या दमदार सुरवातीनंतर वेगवान गोलंदाज इशांत शर्माने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर इंग्लडचा दुसरा डाव भारताने 180 धावांमध्ये गुंडाळला. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवले. आठव्या क्रमांकावर आलेल्या सॅम कुरॅनने केलेल्या झुंजार 65 चेंडूतील 63 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडला आव्हान निर्माण करता आले.  इशांत शर्माने 51 धावांमध्ये 5 बळी टीपले, तर आश्विनने तीन गडी बाद केले. उमेश यादवने दोन गडी बाद केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत