गुरूवार, 6 मे 2021

Follow Us

Follow Us

भारतीय क्रीडा क्षेत्राचा प्रसिद्ध आवाज कॉमेंटेटर जसदेव सिंग यांचे निधन

भारतीय क्रीडा क्षेत्रातील भारदस्त आवाज आता आपल्याला ऐकायला मिळणार नाही. यापुढे, हा आवाज केवळ जुन्या आठवणी आणि संग्रह स्वरुपातूनच आपल्याकडे राहिल.

रायगड माझा वृत्त | नवी दिल्ली

Indian sports field's famous commentary 'Jasdev Singh passes away' | भारतीय क्रीडा क्षेत्राचा प्रसिद्ध आवाज कॉमेंटेटर जसदेव सिंग यांचे निधन

भारतीय क्रीडा क्षेत्राचा प्रसिद्ध आवाज कॉमेंटेटर जसदेव सिंग यांचे निधन

भारतीय क्रीडा क्षेत्रातील भारदस्त आवाज आता आपल्याला ऐकायला मिळणार नाही. यापुढे, हा आवाज केवळ जुन्या आठवणी आणि संग्रह स्वरुपातूनच आपल्याकडे राहिल. क्रीडा क्षेत्रातील नावाजलेले निवेदक (कॉमेंटेटर) जसदेव सिंग यांचे निधन झाले आहे, ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सन 1970-80 च्या दशकात क्रीडा प्रसारणमध्ये रवि चतुर्वेदी आणि सुशील दोशींसह जसदेव सिंह क्रीडा चाहत्यांचे आवडते निवदेक होते.

जसदेव यांनी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये निवेदक बनून दोषाची धुरा सांभाळली होती. त्यांनी 1968 साली हेलसिंकीच्या क्रीडा स्पर्धांपासून 2000 पर्यंतच्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील स्पर्धांच्या 9 सत्रांमध्ये निवेदकाची भूमिका बजावली होती. जसदेव यांना ऑलिंपिक परिषदेकडून 1988 साली सोल ऑलिंपिकमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिंपिक ऑडर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जसदेव यांनी हॉकी विश्वचषक  स्पर्धांमध्येही कॉमेंट्री केली होती. तर 1985 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

जसदेव यांच्या निधनाबद्दल क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. या बातमीने मला अतिशय दुख झाले आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन चॅनेलवरील ते सर्वोत्तम कॉमेंटेटरपैकी एक होते. त्यांनी 9 ऑलिंपिक, 6 आशियाई आणि कित्येकवेळा स्वातंत्र दिवस व गणतंत्र दिवसाचे निवेदन केलं आहे. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया राठोड यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत