भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचा माजी गोलंदाज ‘रमेश पोवार’

रायगड माझा वृत्त :
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचा माजी गोलंदाज रमेश पोवार याची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती हंगामी स्वरूपाची आहे. कायमस्वरूपी प्रशिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत पोवर याच्यावर प्रशिक्षकपदाची धुरा असेल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय.

बडोदा संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू तुषार आरोठे संघाचे प्रशिक्षकपद होते. मात्र, संघातील खेळाडू त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत्या. त्याची दखल घेऊन बीसीसीआयनं आरोठे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचं बोललं जातं. त्यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होतं. ती जागा आता पोवार घेणार आहे.

येत्या २५ जुलैपासून बेंगळुरू इथं महिला क्रिकेट संघाचं सराव शिबीर होणार आहे. त्याची जबाबदारी पोवार याच्यावर असेल. रमेश पोवारनं या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यासाठी मी शक्यते प्रयत्न करीन, अशी प्रतिक्रिया पोवार यानं दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत