भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय

रायगड माझा :वृत्त 

भारतीय महिला संघाने आपली विजयी वाटचाल कायम राखताना बुधवारी येथे सुरू असलेल्या एशियन चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवताना चीनवर 3-1 अशा गोलफरकाने मात केली. भारतासाठी वंदना कटारियाने दोन तर गुरूजित कौरने एक गोल केला. चीनच्या वतीने एकमेव गोल वेन डॉन हिने केला. भारतीय महिला संघाने रविवारी आपल्या पहिल्या सामन्यात जपानचा 4-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवत विजयी सलामी दिली होती.

चीनविरुद्धच्या सामन्यात वंदना कटारियाने चौथ्या मिनिटात गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अकराव्या मिनिटात वंदनाने आपला व संघासाठी दुसरा गोल करून आघाडी 2-0 अशी भक्‍कम केली. पहिल्या क्‍वार्टरचा खेळाच्या शेवटच्या मिनिटाला वेन डानने गोल करून भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. 50 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवत गुरूजित कौरने गोल करून भारताला 3-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत