भारतीय राजदूत करणार परदेशात भारताच्या व्यापाराचा प्रचार

उरण : विरेश मोडखरकर 

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारताच्या निर्यात व्यापाराची जगातील अन्य देशांशी व्यापारात वृद्धी होणे महत्वाचे झाले आहे. परकीय कंपन्याना त्यांची उत्पादन निर्मिती भारतात करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आंतररार्ष्ट्रीय व्यापारात भारतीय क्षमतेची ओळख विविध उत्पादन निर्मिती क्षेत्रास करून देणे क्रमप्राप्त झाले आहे. या अनुषंघाने भारताच्या व्यापार वृद्धीसाठी ११ भारतीय राजदूतांची जेएनपीटी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून आढावा घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर ११ विविध देशातील भारतीय राजदूतांनी जेएनपीटी अधिकाऱ्यांबरोबर जेएनपीटी च्या विविध विकासकामाविषयी तसेच व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या शक्यतांवर चर्चा केली. सौदी अरेबिया,रशिया,कोलंबिया, ऑस्ट्रेलिया,साऊथ आफ्रिका,बेलारूस,डेन्मार्क,ट्युनिशिया,फिजी,कोरिया आणि तुर्कमेनिस्तान ईत्यादी देशातील भारतीय राजदूत व्यापार क्षेत्रास चालना मिळावी यासाठी बैठकीस उपस्थित होते.

जेएनपीटी चे प्रभारी अध्यक्ष  नीरज बन्सल यांनी ११ भारतीय राजदूतांना जेएनपीटी च्या एकंदरीत कामकाजाविषयी माहिती दिली तसेच मागील काही वर्षांपासून इझ ऑफ डुईंग बिजनेस व सागरमाला उपक्रमास सहकार्य करण्यासाठी चालू असलेल्या विविध उपाय योजनांवर प्रकाश टाकला. जगातील प्रमुख बंदरामध्ये जेएनपीटी ३३ व्या क्रमांकावर असून देशातील हे सर्वात मोठे पोर्ट आहे. मार्च २०१८ पर्यंत जेएनपीटी ने सर्वाधिक ४.८३ मिलियन टीईयू ची हाताळणी केली आहे तसेच २०२२ पर्यंत चौथ्या टर्मिनलचे काम पूर्ण होताच पोर्टची क्षमता १० मिलियन टीईयू पर्यंत वाढणार आहे. श्री बन्सल यांनी  पोर्ट मधून निघालेला कार्गो ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत वेळ आणि पैसा दोहोंची बचत होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

जेएनपीटी डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी ) आणि डीपीई  (डायरेक्ट पोर्ट एन्ट्री ) ला प्रोत्साहन देत आहे ज्यामुळे आयात निर्यात व्यापारात होणारा वाहतूकीचा प्रश्न सुटण्यास मदत होत असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.जागतिक मापदंडानुसार अन्य देशाच्या तुलनेत भारतातील वाहतूक खर्च  जास्त असून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि जगाशी बरोबरी करण्यासाठी वाहतूक दर कमी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. बन्सल यांनी आयात निर्यात व्यापाराला सुलभरीत्या कार्गो हाताळणी करता यावी तसेच सर्वोत्कृष्ट सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी  होऊ घातलेल्या पायाभूत सुविधांविषयी माहिती देत जेएनपीटी च्या कामकाजातील प्रगतीविषयी तसेच व्यापाराला चालना मिळावी यासाठी होऊ घातलेल्या जागतिक सुविधाविषयी उपस्थित राजदूतांनी आनंद व्यक्त केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत