भारतीय संघाला मोठा धक्का; सरावादरम्यान रोहित शर्मा दुखापतग्रस्त

नवी दिल्ली: महाराष्ट्र News 24

सामन्यासाठी दोन दिवस उरले असताना भारतीय संघासाठी एक मोठी बातमी आली आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर शुक्रवारी सराव करत असताना टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. दुखापतीमुळं रोहितला सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले.

नेट प्रॅक्टिस दरम्यान गोलंदाजाचा चेंडू रोहितच्या पायाला लागला, त्यामुळं अभ्यास सोडून रोहित बाहेर गेला. लगेचच फिजिओनं रोहितला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. दरम्यान रोहितची जखम गंभीर आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, भारत-बांगलादेश यांच्यात 3 नोव्हेंबरला पहिला टी-20 सामना होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ नवी दिल्लीमध्ये सराव करत आहे. एकीकडे दिल्लीतील वायू प्रदुषणामुळं खेळाडूंना मास्क घालून सराव करावा लागत आहे. तर, दुसरीकडे पर्यावरणमित्रांनी हा सामना होऊच नये या आशयाचे पत्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना लिहिले होते. मात्र, गांगुलीनं सामना नवी दिल्लीतच होणार असे स्पष्ट केले. त्यामुळं सोमवारी आणि मंगळवारी बांगलादेशच्या खेळाडूंनी मास्क परिधान करून सामना खेळला.

भारत-बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामने होणार आहेत. या मालिकेसाठी विराट कोहलीचा विश्रांती देत रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आले. दरम्यान याआधी दोन दिवस दोन्ही संघांनी कोटला येथे अभ्यास केला. दरम्यान प्रदुषणामुळं दोन्ही संघांना काही काळ मैदानाबाहेर सराव करता आला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत