भारत आणि रशिया या दोन देशाच्या मैत्रीचा पहिला दुवा ठरलेल्या अफनासी निकेतनच्या स्मारकाची दुरवस्था

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयाचे दुर्लक्ष

मुरूड : अमूलकुमार जैन

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या सर रावबहादूर तेंडुलकर विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ठेवा असलेल्या अफनासी निकेतन यांच्या स्मारकाची दुरावस्था झाली असून याकडे संबंधित विद्यालयाच्या प्राचार्य यांच्यासाहित सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.
अलिबाग तालुक्यातील चौल आणि रेवदंडा हि जुळी भवनडे म्हणजे दक्षिण टोकाची जुळी नागरी होती. या ठिकाणी निसर्गाने भरभरून मुक्त हस्तानेवनश्री उभारली. १५ व्य शतकात या सुंदर नगरीमध्ये आलेला रशियन प्रवाशी हा अफनाशी निकेतन हा भारत आणि रशिया या दोन देशाच्या मैत्रीचा पहिला दुवा ठरलेला आहे. या निकितनने भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले ते चौल आणि रेवदंडा बंदरावरच.
या ठिकाणी रशियन शासनाने रेवदंडा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या सरदार राव बहादूर तेंडुलकर कनिष्ठ  महाविद्यालयाच्या प्रागंणात स्मारक उभारले आहे. . या स्मारकाच्या अनावरणावेळी रशियन पाहुणे मंडळी आली होती. ह्या स्मारकाचे अनावरण मास्नीव्ह आईओरी,व अलेक्झांडर यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलासवाशी  निष्णात विधितज्ञ् दत्त पाटील हे होते. त्यावेळी रशियन पाहुणे यांनी सांगितले होते कि, आम्ही प्रेम घेऊन आलो आहोत. अफणशीच्या आगमनाने आणि त्याने लिहून ठेवलेल्या वारणामुळे हि दांत कथा राहणार नाही. त्याच्या लिखाणाचे वाचन आजही रशियात होत आहेत. अफनाशी निकटचे स्मारक रशियातसुद्धा आहे. त्या स्मारकाजवळ नवविहवीत जोडपी हि सुखी जीवनासाठी आशीर्वाद मिळावे यासाठी येत असतात.अलेक्झांडर  यांचे म्हणे अशे आहे कि, ५५० वर्षांपूर्वी भारताची प्रतिमा हि रहस्यमय होती. भारतीय माणसाला शिंग आहे अशी दंतकथा होती.अफनाशी १४६६ मध्ये व्यापारी प्रवासात असताना त्याला तो प्रवास साधा वाटत होता.
अफनासी निकेतन ह्यांच्या स्मारकाची समोरची तसेच मागील बाजूस मारबल फरशीचा तुकडा उडालेला आहे.त्याच प्रमाणे या स्मारकाजवळ मोठमोठी झाडे असल्याने त्यावर बसणाऱ्या पक्ष्यांची विष्ठा ही स्मारकावर पडत असल्याने ते विद्रुपकरणं होत आहे.तसेच त्या वृक्षांचा पालापाचोळा पडून त्या ठिकाणी कचरा गोळा झाला आहे.त्या स्मारकाभोवती असणारी लोखंडी जाळी सुध्दा तुटक्या अवस्थेत आहे.ह्या स्मारकाशेजारी असणाऱ्या पत्र्याचे फलक चारी बाजूस गंजलेल्या अवस्थेत आहे.
ह्या स्मारकाची वेळीच योग्य दखल घेऊन त्याच्या स्वच्छता करण्याकडे भर दिला नाही तर हे स्मारक फक्त आठवणी पुरता तर मर्यादित राहणार नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे.
हे स्मारक आमच्या विद्यालयाच्या प्रांगणात असल्याने आमच्या विद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आहे.ह्या स्मारकाची स्वच्छता राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.या स्मारकाची स्वच्छता ही ताबडतोब करून घेतली जाईल
           रामदास पाडगे, प्राचार्य, कोकण एज्युकेशन सोसायटीचे सर राव बहादूर तेंडुलकर विद्यालय,रेवदंडा अलिबाग
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत