भारत-पाक चर्चेसाठी इम्रान खान यांनी लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याचं समजत आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद, काश्मीर प्रश्न आणि इतर काही प्रश्न चर्चेने सोडवले पाहिजेत अशी विनंती इम्रान खान यांनी मोदींना पत्रात केल्याची माहिती मिळत आहे.

imran writes to modi calls for resumption of peace dialogue | भारत-पाक चर्चेसाठी इम्रान खान यांनी लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यात बैठक व्हावी यासाठी इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांकडे आग्रह धरल्याची माहिती मिळत आहे.  पुढच्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एकमेकांना भेटणार नाहीत अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. मात्र इम्रान खान यांच्या पत्रामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांती प्रस्ताव सुरू करण्याच्या दृष्टीने आता पाऊल टाकल्याचं म्हटलं जातं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत