भारत बंद: शेतकरी संघटना आक्रमक; ठिकठिकाणी रस्ते,रेल्वे वाहतूक बंद

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 ऑनलाईन

मोदी सरकारनं मंजूर केलेल्या नव्या कृषि विधेयकांना शेतकऱ्यांमधून विरोध वाढताना दिसत आहे. या विधेयकांना काँग्रेससह विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर दिल्ली-चंदीगढ बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यानंतर आज शेतकरी रस्त्यावर उतरले. महामार्गावरील वाहतूक रोखण्यास सुरुवात केली. तर हरयाणा आणि पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वेही रोखल्या. शेतकरी आंदोलन लक्षात घेऊन अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पंजाब, हरयाणात या विधेयकांविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं उग्र रूप लक्षात घेऊन दिल्लीत हरयाणा सीमेलगतची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत