भारत माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही – हाफिज सईद

( रायगड माझा ऑनलाईन टीम )

लाहोर – आज मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदची नजर कैदेतून सुटका होत असून त्याने सुटका होणार असल्याचे समजताच काश्मीर प्रश्नावर वक्तव्य केले आहे. भारत आपल्या केसालाही धक्का लावू शकत नाही, असे जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदने म्हटले आहे. त्याची १० महिन्यानंतर नजरकैदेतून सुटका होत आहे.

हा माझा नाही पाकिस्तानचा प्रश्न आहे. पाकिस्तान आज स्वतंत्र्य देश आहे. भारत माझे काहीही वाकडे करू शकत नाही. लवकरच काश्मीर स्वतंत्र होईल, अशी धमकीही सईदने दिली आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तथा जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला सोडण्याचे आदेश पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या न्यायालयीन पुनरावलोकन बोर्डाने काल दिले होते. जानेवारी महिन्यात सईदला नजकैदेत ठेवण्यात आले होते. त्याच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करण्याचा सरकारचा आग्रह फेटाळत बोर्डाने काल सईदला सोडण्याचा आदेश दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत