‘भारत माते’चा जयजयकार करणं महागात पडलं

मध्यप्रदेशातील कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थ्यांना ‘भारत माते’चा जयजयकार करणं महागात पडलं आहे. ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्यामुळे शाळा प्रशासनानं २० विद्यार्थ्यांना शाळेतून हाकललं असून त्यांना परीक्षा देण्यासही मज्जाव केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नामली येथे ही कॉन्व्हेंट शाळा आहे. शुक्रवारी इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी शाळेत ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आलं. हा प्रकार घडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी थेट पोलिसात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यात आलं. दरम्यान, या प्रकारावर शाळा प्रशासनानं मौन बाळगलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत