भार्जे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या अनुसया पवार यांची बिनविरोध निवड

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश साळुंखेंचा करिश्मा

पाली – विनोद भोईर

 

सुधागड तालुक्यात सध्या १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. सदर ग्रामपंचायच्या निवडणुकीकरिता ७ ते १२ मे या कालावधीत नामनिर्देशन पत्रे सादर करण्यता आली असून २७ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या भार्जे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या अनुसया दौलत पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांना सरपंचपदी बिनविरोध निवडून आणण्याचा करिश्मा राष्ट्रवादीचे सुधागड तालुकाध्यक्ष रमेश साळुंखे यांनी केला आहे. भार्जे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा बिनविरोध सरपंच बसविण्याकरिता माजी सरपंच राम उफाळे,यंगस्टर्स मंडलाचे उपाध्यक्ष राम दळवी, गणपत चव्हाण, सखाराम आयरे, अनिल पिंगळे, किसन वाघमारे,गणपत पवार, हरिचंद्र पवार, सुरेश पवार, यशवंत वाघमारे, किसन वाघमारे, पांडू वालेकर, दौलत पवार, विठोबा पवार, श्रावण कोळी, वसंत पवार, धोंडू पिंगळे, सुर्यकांत राजीवडे, शिवराम ठाकूर, महादू खंडेकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

आमचे नेते तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल यांचे नेतृत्वाखाली व गीताताई पालरेचा यांचे  मार्गदर्शनाखाली गेली १० ते १५ वर्षात भार्जे ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकासकामे व तेथील ग्रामस्थांची छोटी मोठी वयक्तिक कामे आंम्ही कायम करीत आलो सल्याने आम्ही येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करू शकलो

रमेश साळुंखे, तालुकाध्यक्ष ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत