भावाला जीवनदान देण्यासाठी बहिणीने केले किडणीदान

वणी (नाशिक) :  रायगड माझा वृत्त 

बहिण -भावाच्या नात्यांची अतुटता दर्शवत आपल्या भावाला जीवनात शारीरिक संपन्नता प्राप्त व्हावी. आपला भाउराया सुखी रहावा या तळमळीने बहिणीने अतुट नात्याची उच्चकोटीची संवेदना दर्शवित किडणीग्रस्त असलेल्या भावाला स्वतःची किडणी दान करुन भावालाच रक्षाबंधनाची भेट देत बहिण-भावाच्या नात्याचा आदर्श पैलू उलघडला आहे. मात्र, हे होत असतांना या भावडांच्या मोठी बहिणीचा ह्द्यविकाराच्या झडक्याने झालेला अकाली मृत्यु आघात करुन गेला आहे.

वणीतील पहिले केबल व्यवसायीक म्हणून परीचित असलेले व सध्या शेती व्यवसाय करणारे रविंद्र उर्फ दत्तात्रय पाटोळे, वय 46 यांना गेल्या अकरा वर्षापूर्वी पायाच्या आजारावर चुकीचे उपचार व पेन किलरचे डोस अधिक प्रमाणात झाल्याने मूत्रपिंडावर परिणाम झालेला होता. यावर मुंबई येथील केइएम रुग्णालयात तद्पासून मुत्रपिंडावर उपचार सुरु होते. मात्र डिसेंबर 17 पासून मुत्रपिंडाचे कार्य कमी कमी होत गेल्याने डॉक्टरांनी रुग्ण डायलेसीसवर आल्याचे सांगून रुग्णाच्या उर्वरीत आयुष्य चांगले आरोग्यमय घालवायचे असेल तर मुत्रंपिड प्रत्यारोपन करणे गरजेचेे असल्याचे सांगितल्यानंतर रविंद्र पाटोळे यांचेे कुटुंब हादरले.

यानंतर रविंद्र पाटोळे यांना मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे पुढील उपचार करण्याचा निर्णय घेत. डॉ. प्रशांत राजपूत यांच्या निगराणीखाली उपचार सुरु करण्यात आले. यानंतर किडणीसाठी रविंद्र पाटोळे यांना त्यांना त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या चारही बहिणी व लहाण भाऊ यांनी किडणी देण्यासाठी तयारी दर्शविली. यासर्वांनी मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल गाठत तेथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटून सर्वांनी किडणी देण्याची तयारी दर्शविली, यावेळी रविंद्र यांच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठी असलेल्या व वणी येथेच जिल्हा परीषद शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मंगला उर्फ सिमा देवानंद मोरे या बहीणीची किडणी योग्य असल्याने डॉक्टरांनी सांगितले.  बहिणी मंगला हीनेही अभिमानाने आपली किडणी देण्याची तयारी दर्शविली. यावेळी त्यांच्या दोन मुली किरण, ज्ञानेश्वरी, पती देवानंद मोरे, जावई सचिन व कुटुंबियांनी या निर्णयाला साथ दिली. यासाठी सर्व कुटुंबीयांचे डॉ. प्रशांत राजपूत यांनी समुपदेशन केले. या साठी आवश्यक ती सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता किडणी प्रत्यारोपन समितीच्या मान्यतेनंतर प्रत्यारोपन प्रक्रिया सुरू करण्यात येवून ता. 26 जुन रोजी रविंद्र यांच्यावर यशस्वीरीत्या किडणी प्रत्यारोपन शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर रविंद्र यांचे प्रत्यारोपित किडणीचे कार्य उत्तमरीत्या सुरु झाल्याने तसेच किडणीदाती बहीण मंगला हीची तब्बेतही सर्वसामान्य होत असल्याने कुटुंबीयांमध्ये भावास जीवनदान मिळाल्याचा आनंद व बहीणीचा अभिमान वाटत असतांना व याचवेळी रविंद्र व मंगला यांची मोठी बहिण अलकाताई नेरकर, रा. धुळे ह्या वणी येथे माहेरी शस्त्रक्रियेपूर्वी भेटण्यासाठी आलेल्या असतांना ता. 27 जुन रोजी वटपौर्णिमेचा रात्री उपावास सोडल्यानंतर अचानक ह्द्ययविकाराचा झटका आल्याने मृत्यु झाला.

रक्षाबंधनादिवशी बहीण भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी भावावर सोपविते. ती जबाबदारी स्वीकारून भाऊ या दिवशी आपल्या बहिणीस भेटवस्तू देतो. मात्र, या रक्षाबंधनाच्यावेळी मंगलाताईने आपल्या भावासाठी आगळी-वेगळी भेट देऊन बहीण-भावाचे ऋणानुबंध घट्ट करून भावाला जीननदायी ठरली. तर दुसरीकडे या भावंडाच्या मोठ्या बहिणेने अचानकपणे सोडलेले जग हे अतिशय वेदनादायी ठरले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत