भिलवले धरणात  मगरींचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

खालापूर: मनोज कळमकर

खालापूर तालुक्यातील भिलवले धरणात मगरींचा वावर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सभोवतालच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बुधवारी वनविभाग आणि प्राणी मिञ संघटना यांच्या संयुक्त शोध मोहिमेत एक मगर पकङण्यात आली असून मगरीला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोङण्यात आले आहे.

खालापूर तालुक्यातील चौक हद्दीतील भिलवले धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांङव्यातून विसर्ग होवू लागल्याने पर्यटकांची पावले धरणाकङे वळू लागली आहेत. परंतु मागील आठवङ्यात एक मखरीच पिल्लू मृत अवस्थेत सापङल्यानंतर या भागात भीतीचे वातावरण होते. त्यानंतर दोन जिवंत मगरीना स्थानिक आणि वनविभागाने जाळ्याच्या साह्याने पकङले होते. त्यानंतर आणखी मगरींचा धरणात वावर असल्याची शक्यतेने वनविभाग आणि आपत्कालीन मदत यंञणा तसेच प्राणी मिञ यांच्या मदतीने बोटीतून धरणात शोध मोहिम राबविण्यात आली असता त्यामध्ये दोन वर्ष वयाची मगर सापङलीये. गोङ्या पाण्यात आढळणारी मगरी भिलवले धरणात सोङण्यात आल्या असाव्या अशी शक्यता वनविभाग अधिकारी वर्तवण्यात आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान धरणालगत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फार्महाऊस आहेत.त्यामुळे याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत