भिवंडीमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

भिवंडी : रायगड माझा वृत्त 

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. पुलावरील दोन्ही बाजुची वाहतूक थांबविण्यात आली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 2006 मध्ये साली हा पूल बांधण्यात आला होता.

भिवंडी एस.टी.स्थानकासमोर उड्डाणपुलाखाली बांधलेल्या शौचालयाजवळ बुधवारी (5 सप्टेंबर) सकाळी पुलाचा काही भाग कोसळला. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुल हा धोकादायक असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. मनपा प्रशासनाने नुकतेच स्ट्रक्चरल आँडीटसाठी शासनाच्या व्हीजेटीआय या संस्थेला पत्र दिले आहे. मात्र त्यापुर्वीच उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत