भीक मागण्यासाठी चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या महिलेला मुंबर्इतून अटक; बाळाची सुखरुप सुटका

पुणे- रायगड माझा वृत्त

पुणे रेल्वेस्थानकातून १७ अाॅगस्ट राेजी झाेपलेल्या संगीता अानंद कंग (२५, रा. काेपार्डे, ता. करवीर, जि. काेल्हापूर) या महिलेचा चार महिन्यांचा मुलगा पळवून नेण्यात आला होता.

kidnapped baby is safely rescued from the clutches of a woman at Pune Railway Station

याप्रकरणी पुणे लाेहमार्ग पोलिसांनी एका भिकारी खबऱ्यामार्फत माहिती काढली असता लहान मुलास पळवणारी महिला मुंबईतील जाेगेश्वरी येथे भीक मागत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार महिलेला अटक करून बाळाची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, लहान मूल कडेवर असल्यामुळे लाेक जास्त भीक देतात, त्यामुळे मुलगा पळवल्याची कबुली अाराेपी महिलेने पाेलिसांना दिली.

याप्रकरणी मनीषा काळे (मू. रा. भुतकरवाडी, जि. अहमदनगर) या महिलेला अटक करण्यात अाली. तिच्या ताब्यातून प्रमाेद कंग या चार महिन्यांच्या बाळाच सुटका करण्यात अाली अाहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत