भीमाशंकर येथे दरीत पडून युवकाचा मृत्यू

राजगुरूनगर : रायगड माझा 

येथील 17 वर्षीय प्रणव उर्फ विकी विलास पवळे याचा भीमाशंकर येथील दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी  सायंकाळी घटली. घातपात झाल्याचा पोलिसांचा संशय असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

 

याबाबत खेड पोलीस ठाण्यात प्रणव याचे चुलते कैलास पवळे (रा. रेटवडी, ता. खेड) यांनी खबर दिली आहे. त्यानुसार प्रणव पवळे हा त्याच्या चुलत बहिणीचा साखरपुडा झाल्यानंतर कोणालाच दिसला नाही. परिसरात त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही. त्याच्या वडिलांची दुचाकीही (एमएच 14 एएक्‍स 6774) आढळून आली नव्हती. ती घेऊन तो कोठेतरी मित्रांसोबत गेला असावा असा अंदाज केला; मात्र तो रात्री नऊ वाजेपर्यंत आलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भीमाशंकर येथून त्याच्या घरी फोन आला की प्रणव उर्फ विकी पवळे हा भीमाशंकर येथील वनस्पती पॉइंट दरीत खाली खोल पडला आहे. त्याचे दरीत पडल्याचे फोटो एका व्यक्तीच्या व्हॉटस ऍपवरून पाठविण्यात आले.

यावरून त्याचे चुलते कैलास पवळे यांनी खेड पोलिसांना कळविले.   पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने भीमाशंकरच्या दरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्यावर आज राजगुरुनगर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रणव उर्फ विकी पवळे हा चुलत बहिणीचे लग्न सोडून भीमाशंकर येथे कसा गेला. कोण बरोबर गेला. तो दरीत पडला की त्याला कोणी ढकलले याबबत अनेक प्रश्न पोलिसांसमोर असून त्याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी. एल. गिझरे करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.