भीषण अपघात, 10वीच्या निरोप समारंभाच्या दिवशी विद्यार्थ्याने घेतला जगाचा निरोप

पालघर: रायगड माझा वृत्त

वाणगाव-डहाणू रस्त्यावर ट्रिपल सीट जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यात एका विद्यार्थ्याचा जागीत मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर सेलवास येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही मुले वाणगाव येथील जे.एम.टी हायस्कूलमध्ये दहावीत शिकतात. मंगळवारी दहावीचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. निरोप समारंभ संपल्यानंतर डहाणू बिचवर फिरायला जाताना आसनगाव जवळ दुचाकी पुलावरून खाली पडली. यात उपदेश मदन माच्ची या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर अजित काशीनाथ मोरे (16) आणि दुर्गेश माछी (16, रा. सर्व कासपाड़ा डेहने फळे) हे जखमी झाले. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत