भीषण आगीचे सत्र सुरूच; मलंगगडावरील हजारो झाडे जळून खाक

bike-fire-pic

कल्याण : रायगड माझा वृत्त

मांगरूळमधील एक लाख झाडे जळाल्याची घटना ताजी असताना आता मलंगगडाच्या डोंगरालाही समाजकंटकांनी आग लावली. यामध्ये हजारो झाडे जाळून खाक झाली आहेत. सलग तिसऱ्या वर्षी मलंगगडपट्टय़ातील डोंगररांगा आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असतानाही वनविभाग मात्र सुस्तच आहे. आगीचे सत्र थांबावे यासाठी वनविभाग काहीच प्रयत्न करत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

मलंगगड परिसरातील मांगरूळ येथील कनजमिनीच्या 80 एकर जमिनीकर शिकसेनेच्या पुढाकाराने एक लाख झाडे लाकण्यात आली होती. झाडांचे योग्य प्रकारे संगोपन क्हाके, यासाठी पाण्याच्या टाक्या आणि पाइपलाइनची क्यकस्था केली होती. शिकाय अंबरनाथनजीकच्या जाकसई या गाकीदेखील लोकसहभागातून 68 हजार झाडे लाकली होती. मात्र नोक्हेंबर महिन्यात समाजकंटकांनी या झाडांना आग लाकली. कनकिभागाच्या निष्काळजीपणामुळे या झाडांच्या भकितक्याकरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच आता मलंगगडाच्या तीन डोंगराकर शनिकारी मध्यरात्री समाजकंटकांनी आग लाकली. पहाटे मलंगगड परिसरात मोठय़ा प्रमाणात धुराचे लोट दिसू लागल्यानंतर ग्रामस्थांनी डोंगराकडे धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केला.

वन्यप्राण्यांचे स्थलांतर

मलंगगड, कुशीवलीच्या डोंगरात ससा, कोल्हा, रानडुक्कर, पट्टेरी वाघांचादेखील अधिवास आहे. मलंगगडच्या डोंगररांगांमध्ये वारंवार आगीच्या घटना घडूनही वनविभाग मात्र सुस्त आहे. आगीची झळ बसताच पक्षी आणि प्राण्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. मलंगगडपट्टय़ातील अनेक गावांतील शेतांमध्ये पक्षी आणि प्राण्यांनी आसरा घेतल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत