भुजबळांच्या मदतीला शिवसैनिक धावले!

नागपूर :रायगड माझा वृत्त :

छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते. शिवसेना सोडल्यानंतरही भुजबळ यांच्याविषयी शिवसेनेच्या नेते, आमदार यांच्या मनामध्ये ममत्व असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्याचीच प्रचीती आज विधानसभेत मिळाली.

भुजबळ यांचा अवमान करणारी वक्तव्य केल्याने श्रीगोंदा तालुक्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर माने यांच्या विरोधात हक्कभंग ठराव आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात मांडला. यावेळी सदनातील बहुतेक सद्यस्यांनी या मस्तवाल अधिकारी तात्काळ निलंबित केला पाहिजे, यासाठी अध्यक्षयना साकडे घातले. यावेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी भुजबळ यांची बाजू मांडताना त्या मस्तवाल अधिकारी तात्काळ बडतर्फ झालाच पाहिजे, अशी भूमिका घेत आग्रही मागणी केली. तसेच शिवसेनेचे आमदार वेलमध्ये धावले. त्यावेळी भुजबळ शांतपणे पाहत होते. त्यांच्या मदतीला शिवसेना आमदार धावल्याचे चित्र सभागृहात काही काळ निर्माण झाले.

भुजबळ जेव्हा तुरुंगात होते त्यावेळी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात भुजबळ यांच्या अटकेविषयी लिहिण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते भुजबळ यांच्या भेटीला गेले होते. तुरूंगातून बाहेर आल्यावर भुजबळ यांनी याबाबत जाहीर उल्लेख करीत आभार मानले होते. एकेकाळी शिवसेनेची मुलुख मैदान तोफ असलेल्या भुजबळ यांच्या नजरेसमोर शिवसेनेतील ते सोनेरी दिवस तरळून गेले असतील.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत