भुजबळांना जामीन, कार्यकर्त्यांचा नाशिक,येवल्यात जल्लोष!

नाशिक : रायगड माझा

छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याची बातमी येताच भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि भुजबळ समर्थकांनी एकच जल्लोष केला.

कार्यकत्यांनी फटाके फोडले आणि एकमेकांना मिठाई देवून जल्लोष केला. गेली दोन वर्ष आम्ही या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आज आला अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

भुजबळांचा गढ असलेल्या नाशिकमध्येही कार्यकत्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. भुजबळ फार्म हाऊसवरही सकाळपासून लगबग होती. कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत