भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण; ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक

इंदोर : रायगड माझा ऑनलाईन

Image result for bhaiyyu maharaj

भैय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पलक (वय २५), महाराजांचा सेवादार विनायक दुधाले आणि शरद देशमुख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांवर भैय्यू महाराजांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक एच. सी. मिश्रा यांनी दिली आहे.

भैय्यू महाराजांनी गेल्या वर्षी २१ जून रोजी इंदोर येथील आपल्या राहत्या घरी स्वतः गोळी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी अटक केलेल्या पलक या महिलेने महाराजांना ब्लॅकमेल करून तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी दबाव घातला होता. यासाठी या महिलेला विनायक आणि देशमुख याने मदत केली होती, अशी माहिती तपासातून पुढे आल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

तिघांनी षडयंत्र रचून महाराजांचे शोषण केले. यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असे भैय्यू महाराज यांची पत्नी आयुषी हिने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.

या प्रकरणी अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मनमीत अरोराने पलकची भैय्यू महाराजांशी भेट घालून दिली होती. त्यानंतर विनायक आणि देशमुख यांनी पलकला महाराजांना ब्लॅकमेल करण्यासाठी पुढे केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत