भोकरपाडा ते उजळोली रस्ता होणार चकाचक; डांबरीकरणाकरीता आमदार थोरवेंच्या प्रयत्नांतून 15 लाखाचा निधी मंजूर

खालापूर : समाधान दिसले

खालापूरातील गेल्या काही वर्षापासून भोकरपाडा ते उजळोली रस्त्याची दुरावस्था झाल्याने या अंतराच्या मार्गावरून प्रवास करणे सर्वाना जिकरीचे बनले आहे. हा मार्ग वर्दळीचा असून दैनंदिन या परिसरातील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व अन्य वाहनांची वाहतूक सुरू असल्याने खड्डेमय मार्गावर प्रवास करणे मोठे कसरतीचे झाले होते. त्यामुळे खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांसह वाहन चालकांना नाराजी सूड उमटत असताना येथील प्रवासी व वाहन चालकांची समस्या आमदार महेंद्र थोरवे यांनी जाणून घेत 25 – 15 निधी अंतर्गत या रस्त्याच्या डांबरीकरणाकरीता 15 लाखांचा निधी उपलब्ध केल्याने हा मार्ग लवकरच खड्डेमुक्त होणार असून सर्वाना दिलासा मिळणार असल्याने प्रवासी, वाहन चालक व परिसरातील नागरिकांनी आमदार थोरवेंचे आभार मानले आहेत.

भोकरपाडा ते उजळोली मुख्य रस्त्याची खड्डेमय अवस्था बनल्याने या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूड उमटत असुन येथून प्रवास करणे सर्वाना कठीण बनले आहे. या मार्गावरून दररोज असंख्य प्रवाशांची वर्दळ सुरू असून हा परिसर ग्रामीण परिसर म्हणून ओळखला जात असला तरी येथील विद्यार्थी वर्ग हा तालुक्यातील शहरांमधील शाळा, महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी तीन चाकी रिक्षासह अन्य वाहनांनी प्रवास करीत असल्याने या खड्ड्यातून प्रवास करताना त्याच्यामध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या मार्गाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवून रस्ता खड्डे मुक्त करा, अशी मागणी जोर धरत असताना येथील ग्रामस्थ, वाहन चालक व प्रवासी वर्गाची मागणीचे गांभीर्य आमदार महेंद्र थोरवेंनी घेत या रस्त्याच्या दुरुस्ती करता पाठपुरावा केल्याने आमदार थोरवेच्या प्रयत्नातून 25 – 15 योजनें अंतर्गत भोकरपाडा ते उजळोली रस्त्याच्या डांबरीकरणाकरीता 15 लाखांचा निधी मंजूर झाल्याने हा मार्ग लवकरच चकाचक होणार असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त करीत आमदार महेंद्र थोरवेच्या कामगिरीबद्दल आभार मानत आहेत.

“भोकरपाडा ते उजळोली हा रस्ता गेल्या काही वर्षापासून खड्ड्याच्या विळख्यात सापडल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना सर्वानी कठीण बनले होते, त्यामुळे या रस्त्याच्या नुतनीकरणाकरीता आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रस्ताव मांडल्यानंतर आमदार थोरवेंनी या रस्त्याच्या नुतनीकरणाकरीता पाठपुरावा केल्याने या रस्त्याच्या डांबरीकरणाकरीता 25 – 15 योजने अंतर्गत मंजूरी मिळाल्याने आता मार्ग लवकरच खड्डेमुक्त होऊन सर्वाना दिलासा मिळेल.”
– रोहीत विचारे (युवानेते शिवसेना)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत