भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या शैलेजा दराडे रायगडच्या शिक्षणाधिकारी

म्हसळा : निकेश कोकचा

रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची ठाणे जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्या बदलीने रिक्त झाल्या जागेवर पुण्यातील शैलेजा दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेजा दराडे पुण्यात प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या पदावर असताना त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
पुणे  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे यांच्या सांगण्यावरून ५० हजारांची लाच स्वीकारली असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन यांनी लाचलुचपतविरोधी पथकाला दिली होती.हे प्रकरण पुणे जिल्ह्यात चांगलेच गाजले होते.या बरोबरच जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागात आरटीआय अंतर्गत अनुदान वितारणामध्ये झालेला घोळ,शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वीकारलेली लाच,अधिकार नसतानाही खासगी शाळेतील शिक्षकांना मान्यता देणे या सारख्या अनेक घटनांमुळे पुण्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे यांना करणे दाखवा नोटीस देखील बजावली होती.या नोटीसचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महाराष्ट्र जिल्हापरिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ९५ (ख) प्रमाणे दराडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
या कारवाई मध्ये त्यांच्याकडील शिक्षण विभागातील खाते प्रमुखाचे पद कडून घेण्यात आले होते.आधीच शिक्षणाची गुणवत्ता खालावलेल्या रायगड जिल्हापरिषद मध्ये अशा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या अधिकारी शैलेजा दराडे यांची शिक्षणाधिकारी पदी बदली होणे म्हणजे रायगड जिल्ह्यात जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांचे भवितव्य जाणीवपूर्वक अंधारात ढकलल्या सारखे होणार आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत