मंत्रालयात शिरला बिबट्या; १०० जणांच्या पथकाकडून शोधकार्य

अहमदाबाद : रायगड माझा ऑनलाईन 

गुजरातच्या मंत्रालयात रविवारी रात्री एक बिबट्या शिरला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून सध्या या बिबट्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून मंत्रालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले. सध्या १०० जणांचे पथक या बिबट्याचा शोध घेत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मंत्रालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या एका गेटच्या खालून आतमध्ये आल्याचे दिसले. यानंतर बिबट्याने थेट मंत्रालयाच्या वास्तूत प्रवेश केला.

या घटनेनंतर लोकांकडून येथील सुरक्षाव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याठिकाणी मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांची कार्यालये असल्यामुळे प्रशासन कोणताही धोका पत्कारायला तयार नाही.

सध्या मंत्रालय पूर्णपणे रिकामे करण्यात आले असून जवळपास १०० जणांचे पथक बिबट्याचा शोध घेत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत