मुंबई : रायगड माझा
गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या चर्चा आणि वर्ष-दीड वर्षावर आलेल्या निवडणुका लक्षात घेता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा होती. मात्र, त्यावर आता पाने फेरले गेले असून पावसाळी अधिवेशानानंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामुळे मंत्रिपदाचे बाशिंग बांधून बसलेल्यांची पुरती गोची झाली आहे.
राज्यात सध्या लोकसभा पोटनिवडणूक, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. शिवाय महामंडळ वाटपदेखील केले जाणार होते. त्यावर कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा असताना आता नवीन शक्यता वर्तवली जात असल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.