मंत्री झालो तरी मी आहे असाच राहणार …- सुजय विखे-पाटील

महाराष्ट्र News 24

मला लोक मला दोनच प्रश्न विचारत आहेत. तुम्ही केंद्रात मंत्री होणार का?, राज्यात बदल होईल का?, साईबाबांच्या कृपेने केंद्रात मंत्री झालो तरी मी आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहणार असल्याचं सुजय-विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

खासदार सुजय विखे- पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत सुजय-विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप चांगले काम करतं आहे. संकट काळात भाजप पक्ष आमच्या कुटुंबामागे उभा राहिला. खासदार झालो, तरी माझ्यात काही बदल झाला नाही, तसाच तो मंत्री झाल्यावरही होणार नसल्याचं सुजय-विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच गृहमंत्री अमित शहा यांची सुजय विखेंची भेट घेतली होती. त्यामुळे या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत