‘मग तुम्ही शत्रूसारखे वागून महाराष्ट्रद्रोह का करताय?’; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

तुम्ही काय करून दाखवलं ? ; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्र News 24

विकास योजनांसोबत शत्रूसारखे का वागताय?, का महाराष्ट्रद्रोह करताय?, असा सवाल अशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड प्रकल्प न्यायालयीन लढाईत अडकण्याची चिन्हे निर्माण झाल्याने आता ही कारशेड बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे नियोजित स्टेशन असलेल्या ठिकाणी हलवण्याची ठाकरे सरकार तयारी करत आहे. याच मुद्यावरुन भाजप नेते अशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर जाईल’ असं अशिष शेलारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, बुलेट ट्रेन नकोच म्हणताय. मेट्रो होऊच नये, अशी व्यवस्था करताय आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय…? मुंबईकरांनो ठाकरे सरकारच्या या तीन तिघाड्यामुळे मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी “वातानुकूलित बैलगाडा” मिळणार असल्याचंही अशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत