मच्छिमार बांधव भारतीय तटरक्षक दलाचे कान आणि डोळे

असिस्टंट कमांडर अजयकुमार यांचे प्रतिपादन!

मुरुड : अमुलकुमार जैन 

मच्छिमार बांधव यांचे आयुष्य हे समुद्रात असते.त्यांना समुद्रातील होणाऱ्या हालचालीची महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्याकडे असल्यामुळे ते भारतीय तटरक्षक दलाचे कान आणि डोळे आहेत, असे प्रतिपादन असिस्टंट कमांडर अजयकुमार यांनी भारतीय तटरक्षक दल आयोजित बाईक रॅली कार्यक्रमात नांदगाव येथे केले.

मच्छिमार बांधवानी आपल्या बोटीच्या नोंदणी कागदपत्रे ठेवणे आवश्यक आहे. मच्छिमार बांधवाना मत्स्यव्यवसाय विभागामार्फत देण्यात आलेले बायोमेट्रिक कार्ड, आधार कार्ड आदी ओळखपत्र ठेवणे गरजेचे असून कोणतीही मच्छिमार बोट ज्याची नोंदणी अपूर्ण आहे तिला मासेमारीची परवानगी दिली जाणार नाही. परवानाधारक बोटी व्यतिरिक्त इतर बोट आपल्या बंदरात आढळली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मच्छिमार बोटींनी मासेमारीकरिता गटागटाने किंवा समूहात समुद्रात जावे, गटातील एका बोटीवर धोक्याची सूचना देणारे यंत्र बसविणे गरजेचे असून बोटीवर जीवसुरक्षा साहित्य सोबत असणे आवश्यक आहे.

एखाद्या आपत्तीमध्ये मच्छिमारांनी एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. आपत्ती काळात तटरक्षक दलाचे तुम्ही कान आणि डोळे आहेत. संकट काळी योग्य ती सूचना किंवा माहिती तटरक्षक दलाकडे पोहचविण्याचे काम तुम्ही केले पाहिजे अशी सूचना असिस्टंट कमांडर अजयकुमार यांनी यावेळी उपस्थित मच्छिमार बांधव आणि ग्रामस्थांना दिले. यावेळी तटरक्षक दलाकडून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला मच्छिमार बांधवांचा मोठा सहभाग होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत