मझगाव येथे शुल्लक कारणावरुण भावाने केला भावाचा खून : आरोपी चुलत भावाला अटक

मजगाव येथे शुल्लक कारणावरुण भावाने केला भावाचा खून : आरोपी चुलत भावाला अटक

म्हसळा :निकेश कोकचा 
म्हसळा पोलिस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या मजगाव येथ शुल्लकशा कारणावरून  भावाने आपल्याच भावाचा खून केल्याची घटना शनिवार दि. १६ फेबृवारी . रोजी घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवार दि. १६ फेबृवारी . रोजी पहाटे दिपक हिरानंद जगताप वय. ४० वर्षे हा तरुण मुंबईहून आपल्या गावी आला होता. मात्र त्याच दिवशी  दुपारी ३ च्या सुमारास आरोपी चुलत भाऊ रवी सोनू जगताप वय ३६ रा. मजगाव ता. तळा याने आपल्या मुंबई वरुण गावी आलेल्या चुलत भावाला घरा मागील पडवीत असणारी झाडे का कापसली ? असे जाब विचारत सुरी व कोयत्यांने हल्ला चढवला. हल्ला एवढा जोरदार होता की, दिपक याच्या हाताच्या सर्व नसा कापल्या गेल्या व दुसरा हल्ला पोटावर करण्यात आला. दोघांचा आरडाओरडा पाहून शेजारी तत्काळ तेथे जमा झाले. मात्र हल्यात जखी झालेल्या दिपकचे अधिक रक्त वाहून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.आरोपी रवी सोनू जगताप याला म्हसळा पोलिसांनी त्वरीत अटक केली असून, मृत दिपक जगतापला सायंकाळी ६च्या सुमारास शवच्छेदनासाठी म्हसळा ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण पवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण कोल्हे यांनी त्वरीत दवाखान्यात भेट देऊन घटनेच्या अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत .
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत