मतदानासाठी वापरलेल्या नगराध्यक्षांच्या दालनाचे नुकसान 

खोपोलीच्या नागराध्यक्षांनी स्वागत कक्षातून केले कामकाज 

खोपोली : समाधान दिसले 

सोमवारी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान पार पडले. खोपोलीत मतदान केंद्र म्हणून नगराध्यक्षाचे दालन वापरण्यात आले होते. परंतु मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी नगराध्यक्षा सुमन औसरमल नियमित कामकाजासाठी आपल्या  दालनात आल्या असता त्यांना दालनांत सर्वत्र कचरा, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाण्याचे पदार्थ अस्ताव्यस्त स्थितीत दिसले. तसेच टेबलावरील किंमती काच व इतर साहित्याचे नुकसान झालेले आढळून आले. त्याची दखल घेत अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व  झालेले नुकसानाची भरपाई संबंधितांकडून मिळेपर्यंत आपण दालनांत बसणार नाही, असा पावित्रा घेत सुमन औसरमल यांनी तसे पत्र जिल्हाधिकारी रायगड व कोकण विभाग आयुक्तांना लिहले तसेच निषेध म्हणून  दिवसभर दालना बाहेर बसून दैनंदिन कामकाज केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत