मतदान जागृती केल्याप्रकरणी नक्षलवाद्यांकडून विद्यार्थ्याची हत्या

बीजापूर : रायगड माझा ऑनलाईन 

छत्तीसगड मध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मतदार जागृती केल्याप्रक्रणी नक्षलवाद्यांनी एका विद्यार्थ्याचा खून केला आहे. बिजापूर जिल्ह्यातील आदवाडा गावातील ही घटना असून मृत विद्यार्थ्याचे नाव दीपक उरसा असे आहे.

छत्तीसगडमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. दीपक उरसा हा पदवीच्या द्वितीय वर्षात शिकत होता. दीपकने लोकशाहीच्या सदृढतेसाठी मतदार जागृतीसाठी मोठे काम केले. हे तिथल्या नक्षलवाद्यांना रुचले नाही. नक्षलवाद्यांनी त्याला धमकी देऊन हे कार्य करण्यापासून रोखले होते परंतु दीपकने जिवाची पर्वा न करता आपले कार्य सुरूच ठेवले.

शेवटी नक्षलवाद्यांनी दीपकचे अपहरण करून त्याचा गळा चिरून त्याला ठार केले. त्याला मारल्यानंतर गावाच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर त्याचा मृतदेह फेकला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपासासाठी पोलीस अजूनही घटनास्थळी दाखल झाले नाहीत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत